वैजापूर तालुक्यातील वृद्ध व निराधारांना दिलासा ;लाभार्थ्यांच्या खात्यात 2 कोटी 91 लाख रुपये जमा
वैजापूर ,३ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- गेल्या चार महिन्यापासून रखडलेला संजय गांधी निराधार व अन्य योजनेच्या लाभार्थ्याचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून दिवाळी सणाच्या दोन दिवसांपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 कोटी 91 लाख 67 हजार रुपयांची रक्कम टाकण्यात आली आहे.
राज्य व केंद्र सरकारतर्फे वृद्ध, निराधार व्यक्ती व विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार व अन्य योजनां राबविल्या जातात.या योजनांतर्गत वैजापूर तालुक्यातील 12 हजार 640 लाभार्थ्यांना अनुदान मिळते. शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे गेल्या चार महिन्यापासून लाभार्थ्यांचे हाल होत होते.अनुदान नसल्याने दिवाळी अंधारात साजरी करावी लागते की काय अशी चिंता लाभार्थ्यांमध्ये होती.मात्र,दिवाळी सणाच्या दोन दिवसांपूर्वी संजय गांधी निराधार योजना (67लाख 20 हजार 800 रुपये),श्रावणबाळ योजना (2 कोटी 23 लाख रुपये) इंदिरा गांधी योजना (7लाख 6 हजार रुपये) असा एकूण 2 कोटी 91 लाख 67 हजार रुपये निधी शासनाकडून प्राप्त झालाअसून,लाभार्थ्यांच्या खात्यांवर रक्कम जमा करण्यात आली आहे