भगवा ध्वज हिंदुत्वाच्या विचारांचे प्रतीक – आमदार अंबादास दानवे

ध्वज दीपावली अभियानात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग

औरंगाबाद,२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-

शिवसेनेच्या वतीने कालपासून ध्वज दिवाळी अभियान सुरू असून आज (2 नोव्हेंबर) रोजी  औरंगाबाद पश्चिम शहरात प्रभाग निहाय अभियान राबविण्यात आले शहरातील शिवशंकर कॉलनी , उल्कानगरी ,हनुमान मंदिर रामकृष्णनगर , संभाजी चौक सातारा परिसर , इटखेडा  , बन्सीलालनगर रेल्वेस्टेशन चौक, पदमपुरा  , छावणी , पडेगाव याठिकाणी  ध्वजारोहन उपक्रम घेण्यात आला.

प्रत्येक वार्डात  नागरिकांनी तर स्वतःहून  भगवे ध्वजाचे पूजन करून घरावर ध्वज उभारुन स्वयंस्फूर्तीने या अभियानात आपला सहभाग नोंदवला शहरातील वार्डा-वार्डात, गल्ली- गल्लीत ,घरा- घरांवर भगवे ध्वजामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. 

यावेळी बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, भगवा ध्वज हिंदुत्वाच्या विचाराचे प्रतीक, त्यागाचे ,बलिदानाचे, ज्ञानाचे ,सेवेचे प्रतीक असून दरवर्षी दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रम करतो, फराळाचे कार्यक्रम करतो, आतिषबाजी करतो याबरोबरच यावर्षी शिवसेना नावीन्यपूर्ण अनोख्या पद्धतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले हिंदुत्वाचे विचार घराघरापर्यंत प्रत्येक माता-भगिनी पर्यंत पोहोचवून दिवाळी साजरी करणार आहोत.

Displaying IMG-20211102-WA0071.jpg

माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी सभागृह नेता विकास जैन, गजानन बारवाल, उपजिल्हा संघटक राजू राठोड , शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशहरप्रमुख बापू पवार, अनिल मुळे प्रमोद ठेंगडे ,रमेश बहुले, सतीश निकम, वसंत शर्मा, राजू राजपूत, संजय बारवाल, किशोर कछवाह, अंबादास मस्के, महिला आ घाडीच्या सुनीता आऊलवार, सुनिता देव, प्रतिमा जगताप, अनिता मंत्री, शहर संघटक आशा दातार, विधानसभा संघटक लक्ष्मी नरहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार अंबादास दानवे तसेच ज्येष्ठ हदय रोग तज्ञ डॅा.सतीश  रोपळेकर यांच्या हसते ध्वजारोहण करणयात आले.