मोबाईलचे दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला घेराव घालून पकडले, वैजापूर पोलिसांची कारवाई

वैजापूर ,१ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील स्वस्तिक टॉवरमधील मोबाईलचे दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या पांच जणांच्या टोळीला वैजापूर पोलिसांनी घेराव घालून पकडले.ही घटना शनिवारी पहाटे घडली.

रात्री गस्तीवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक विकास ढाकरे,सहाय्यक फौजदार हुकूमसिंग डांगर,पोलीस नाईक मोईस बेग,पो.कॉ.झाल्टे,  पो.कॉ. घोगरे,पो.कॉ. जाधव, पो.कॉ.कुऱ्हाडे यांच्या पथकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील स्वस्तिक टॉवर्स मध्ये काही संशयित आढळून आले.

पोलिस पथकाने टॉवर्सला घेराव घालून टॉवर्स मधील माऊली मोबाईल शॉपी हे मोबाईलचे दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या राकेश साहेबराव काकडे  (21,रा. मोंढा मार्केट)  आकाश सूनील काकडे  (20,र.लक्ष्मीनगर) संजय विजय बागुल  (र.मोंढा मार्केट) किरण कारभारी काकडे (19, रा. लक्ष्मीनगर)  व करण बन्सी चौरे (20, रा.दत्तवाडी) या पांच जणांच्या टोळीला पकडले तर त्यांचा साथीदार धना रामलाल राठोड हा अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या तावडीतून निसटला.पोलिसांनी झडती घेतली असता चोरट्यांकडे टॉमी,स्क्रू ड्रायवर, धारदार कात्री,मिर्ची पावडर,नायलॉन दोरी आदी साहित्य आढळून आले. याप्रकरणी सहाय्यक फौजदार हुकूमसिंग डांगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.