देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 104.82 कोटीहून अधिक

गेल्या 24 तासात 74 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

देशात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.19%, मार्च 2020 पासून सर्वोच्च

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 14,348 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 1,61,334

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.18%) गेल्या 35 दिवसांपासून 2% पेक्षा कमी

नवी दिल्ली ,२९ ऑक्टोबर /प्रतिनिधी:-देशात गेल्या 24 तासात  74,33,392  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा, देण्यात आल्या असून, आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत एकूण 104.82 कोटीपेक्षा अधिक (1,04,82,00,966)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,04,57,932 सत्रांद्वारे  या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

गेल्या 24 तासात 13,198 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी  एकूण3,36,27,632 रुग्ण आतापर्यंत  कोरोना मुक्त झाले आहेत. परिणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.19% झाला आहे.

सलग 124 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.मागील 24 तासात 14,348 नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,61,334 इतकी असून ही  संख्या एकूण उपचाराधीन  रुग्णांच्या 0.47% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे. 

देशात गेल्या 24 तासात 12,84,552 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 60.58 कोटीहून अधिक  (60,58,85,769) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.18% असून गेले  35 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.12% असून गेले 25 दिवस 2% पेक्षा कमी आणि 60  दिवस  3% पेक्षा कमी आहे.