लॉकडाऊन काळात सायबरचे ५०७ गुन्हे दाखल; २६२ जणांना अटक

मुंबई, दि. २८ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५०७ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले असून २६२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ५०७ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय  गुन्हे दाखल

 ■ व्हॉट्सॲप- १९६ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स – २११ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २७ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १० गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ५९ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २६२ आरोपींना अटक.

■  १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

धुळे जिल्ह्यात आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद

धुळे जिल्ह्यात नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ५ वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात राजकीय व धार्मिक  टिपणीचा मजकूर असणाऱ्या आशयाचे विधान आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून पोस्ट  केले होते व  त्यामुळे परिसरातील  शांतता भंग होऊन ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. 

महाराष्ट्र सायबरचे आवाहन

सध्याच्या काळात इंटरनेटवापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे ,त्यामध्ये मध्यमवयीन व्यक्तींचा मुख्यतः समावेश आहे . अशा व्यक्ती बऱ्याचदा चुकून किंवा अन्य कुतूहलापोटी पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करतात व कालांतराने त्यानां एक मेसेज वा ई-मेल येतो कि ज्यात असे लिहले असते ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या वेबसाईट बघत होतात व आम्ही ते प्रदर्शित करू शकतो आणि तसे नको असल्यास एका विशिष्ट अकाउंट मध्ये काही रक्कम भरा इत्यादी ‘. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि आपण चुकून किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करू नका. सदर वेबसाईट या सेफ नसून कधीतरी तुमच्या नकळत अशा वेबसाईटवरून एखादे Ransomware किंवा व्हायरस डाउनलोड होऊ शकतो जो तुमच्या इंटरनेटवरील गतिविधी व तुमच्या कॉम्पुटरमधील माहिती जमा करून सायबर भामट्यानां पाठवतो आणि मग असे मेसेज येतात . जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद मजकूर असणाऱ्या आशयाचे मेसेजेस आले तर घाबरून जाण्याचे कारण नाही ,आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची तक्रार नोंदवा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील याची माहिती द्या.  

तसेच सर्व नागरिकांनी हे पण लक्षात ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे कि आपल्या देशात माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ब अनवये child pornography शोधणे देखील  गुन्हा आहे.

केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *