जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवावे- पद्माकर मुळे

आयुर्वेद महाविद्यालय पदवीग्रहण सोहळा

औरंगाबाद,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून कष्ट, त्याग, इच्छाशक्ती, स्वयंशिस्त, सातत्त्य आणि दृढ संकल्प जोपासा. आपण जे काम हाती घेतात तसेच काम करता ते समर्पणाच्या भावनेने प्रामाणिक हेतूने करावे. त्यासाठी इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासून आपले ध्येय साध्य करावे ,असे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकर मुळे यांनी सोमवारी केले.

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय 2015-16 च्या बीएएमएस  बॅचचा पदवीग्रहण सोहळा संस्था सचिव पद्माकर मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू ऑडीटोरियम येथे उत्साहात झाला.                     

या प्रसंगी श्री. पद्माकर मुळे म्हणाले ,” कोरोना-19 या वैश्विक संकटाचा बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता या संकटाला सामूहिक प्रयत्नातून रोखले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच स्वच्छता पर्यावरणाला प्राधान्य देऊन आपला समाज आणि आपला परिसर स्वच्छ सुंदर आरोग्य संपन्न बनविण्याचा योगदान द्यावे, प्रत्येकाने जीवनात आई वडिलांचा आदर करण्याबरोबरच राष्ट्राचा आदर करावा, आई, मातृभाषा, पर्यावरण आणि भारत माता या चार मातांना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने या मातांचा आपल्या जीवनात आदर करणे महत्त्वाचे आहे”.                         

याप्रसंगी काही पालकांनी महाविद्यालय आणि संस्थेविषयी कृतज्ञता आणि मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. सुभाष भोयर, डॉ. दत्तात्रय शेळके, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. गणेश डोंगरे, विभागप्रमुख डॉ. जयश्री देशमुख, स्नेहसंमेलन सचिव आयुर्वेद जीवक डॉ अश्विनी फरताडे आणि आयुर्वेद विशारद पुरस्कार विजेते डॉ किरण शिंगणे, पालकवर्ग, विभागप्रमुख, अधिकारीवृद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अरविंद गुंजाळ आणि स्नेहल गाढे यांनी केले.