आमदार बंब यांचा धडाका सुरू,खुलताबाद तालुक्यातील रस्ते पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटींच्या कामांचा शुभारंभ

Displaying IMG-20211025-WA0025.jpg

खुलताबाद,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अतिवृष्टीमुळे तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्ते पुलाच्या दुरुस्तीसाठी आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून दोन कोटींच्या कामांचा शुभारंभ झाला आहे.

तालुक्यातील बाजारसावंगी- इंदापूर- बोडखा- लोणी- चिकलठाणा- कन्नड रस्त्यावरील  पुरहानीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या कामाचे एक कोटी दहा लाख रुपये खर्चाचे काम , बाजारसावंगी- इंदापूर- बोडखा- लोणी रस्त्यावरील अतिवृष्टीत पुरहानीमुळे खराब गॅबियन रिटनिंग वाॅल बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला असून या कामावर  ४३ लाख ८५ हजार खर्च होणार आहे . हर्सूल –  जटवाडा- जैतखेडा रस्त्यावरील अतिवृष्टीत पुरहानीमुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती व पुलाचे बांधकाम ४९ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार प्रशांत बंब याचे स्वीय सहाय्यक रज्जाक पठाण, पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने , जिल्हा चिटणीस ज्ञानेश्वर नलावडे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, पंचायत समितीचे सदस्य प्रभाकर शिंदे, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, संदिप निकम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी एम कोलते, कनिष्ठ अभियंता सागर सावजी उपस्थित होते.