प्रेषित मुहम्मद यांचे जीवन सर्वांसाठी आदर्श – प्राचार्य डॉ.मझहर फारूखी

मौलाना आझाद महाविद्यालयात वक्तृत्व व नात पठण स्पर्धा 

औरंगाबाद,२६ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- शहरातील मौलाना आझाद महाविद्यालय येथे पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनचरित्रावर वक्तृत्व आणि नात पठण स्पर्धा झाली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मझहर फारुखी अध्यक्षीय भाषणात पवित्र ग्रंथ कुराणचा संदर्भ देत म्हणाले की प्रेषित मुहम्मद यांचे जीवन सर्व मानवजाती साठी आदर्श आहे.

यावेळी परिक्षक म्हणून हाफिज असरारुल हक आणि हाफिज अक्रम खान उपस्थित होते.  हाफीज अक्रम खान म्हणाले की,आपण पालकांनी केलेल्या उपकारांची कधीच परतफेड करु शकत नाही. 

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक आयेशा तबस्सुम हाफिज नुसरत,द्वितीय हमजा अब्दुल गफ्फार,तृतीय उमय्या फारुखी तर उत्तेजनार्थ मिनहाज खान यांना मिळाले नात पठण स्पर्धेत प्रथम शेख मदिहा मुश्ताक,द्वितीय मोहम्मद अरीब तर तृतीय स्थान मोहम्मद जीयाद याने पटकावले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या मुल्य शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रा.फेरोज पठाण,सदस्य प्रा.फौजीया मन्सुर,प्रा.मुशीर नदवी,प्रा.सय्यद मुकर्रम,प्रा.सखावत,प्रा.अमजद,प्रा.शकील,प्रा.हुमैरा,प्रा.सिराज,आदिंनी प्रयत्न केले.