सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंतापदी गजेंद्रसिंह राजपूत यांना बढती, आघुर ग्रामस्थांतर्फे भूमीपुत्राचा सत्कार

वैजापूर ,२६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील आघुर गावचे भूमीपुत्र असलेले गजेंद्रसिंह राजपूत यांची सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंतापदी बढती झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आघुर येथे झालेल्या या छोटेखानी सत्कार सोहळ्यात माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती,माजी उपनगराध्यक्ष हाजी शेख अकील,  जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, जिल्हा दूध संघाचे रहीम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रेमसिंग राजपूत, खुशालसिंग राजपूत, मजीद कुरेशी,दिनेश राजपूत,पंचायत समिती सदस्य मयूर राजपूत,नगरसेवक राजेश गायकवाड,शिवसेनेचे बळीराम राजपूत,  युवासेनेचे आमेर अली यांच्यासह ग्रामस्थांनी गजेन्द्रसिंह राजपूत यांचा सत्कार केला.घरच्या सत्काराने श्री.राजपूत भारावून गेले.