औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतीनी पूर्ण केला २० हजार लसीकरणाचा टप्पा

कोरोना लसीकरणासाठी एंडर्स अँड हाऊजर्ससह औद्योगिक संघटनांचा पुढाकाराने लक्ष्य साध्य

औरंगाबाद, २५ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद मधील वाळूज क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकित एंडर्स अँड हाऊजर कंपनीत एंडर्स अँड हाऊजर व सर्व औद्योगिक संघटनांद्वारे सुरू करण्यात आलेल्या कोविड १९ लसीकरण मोहिमेत २५ ऑक्टोबर रोजी २० हजाराचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. वाळूज महानगरातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांना या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आले. देशाच्या १०० कोटी लसीकरण मध्ये आमचा खारीचा वाटा असल्याचा आम्हाला अभिमान आहे अशा भावना त्यांनी यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या.

यावेळी मसिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील, सहसचिव विकास पाटील, प्रसिद्धी प्रमुख राहुल मोगले, सर्जेराव साळुंके, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष रणजित कक्कड, एक्सझिकुटिव्ह सेक्रेटरी हेमंत लांडगे, सीआयआय मराठवाडा झोन चेअरमन रमण आजगावकर उपस्थित होते.

हा प्रवास सांगताना श्रीराम म्हणाले, कोविड १९ महामारीमुळे संपूर्ण जग हादरले होते. यावर मात करण्यासाठी लस बाजारात आली. पण जोवर सर्वांना लसीकरण होत नाही तोवर कोविड संपणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही लसीकरणाची सुरूवात केली. यामधे आश्वासक आकडा आम्ही गाठू शकलो आहोत, असेही ते म्हणाले.

सी आय आय चे विभागीय अध्यक्ष रमण अजगावकर म्हणाले, लसीकरण साठी इंड्रेस प्लस हाऊसर ग्रुपचे एन श्रीराम यांच्या संकल्पनेतून औद्योगिक वसाहतीत मनपाच्या सहकार्याने लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. आज या लसीकरण मोहिमेने २० हजारांचा टप्पा गाठला आहे. खरे तर जेव्हा लसी उपलब्ध होत नव्हत्या अशावेळी आम्ही मोहीम हाती घेतली. मनपाचे सहकार्य आणि काही सी एस आर फंड अशा दोन्हींचा समन्वय साधून ही मोहीम राबवण्यात आली.
25 ऑक्टोबर 2021 रोजी, श्री कृष्णाच्या लसीकरणाने सामुदायिक लसीकरण केंद्राने 20,000 डोसचा टप्पा पार केला आहे. बजाज समूहाकडून लसींच्या देणग्या आणि बीएम कन्स्ट्रक्शन्स, कॅनपॅक, एन्ड्रेस + हौसर, किस्टलर, नाथ सीड्स, सेवक ट्रस्ट आणि सीमेन्स आणि इतर अनेक संस्थांनी CII फाउंडेशनद्वारे केलेल्या देणग्यांमुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले.

मासिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले, जेव्हा 2021 मध्ये शेवटी लस आली तेव्हा लसीकरण करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता आणण्याचे आव्हान होते. लाँच केले, कर्मचा-यांच्या सहभागाने, लसीकरण जाहिरात व प्रचार प्रसार करण्यात आले, विशिष्ट व्हिडिओ करत थीम सॉंग केले. औद्योगिक वसाहतीत ३५० हून अधिक कंपन्या आहेत. ‘या सगळ्या ठिकाणी लसीसाठी जा,कोरोना ला दूर करा’. हा व्हिडिओ करून प्रसार प्रचार करण्यात आला.

औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष रणजित कक्कड म्हणाले, औद्योगिक क्षेत्राचे व एकंदरीत अर्थव्यवस्थेचे चाक पुन्हा सुरू करण्यासाठी आणि सुरू ठेवण्यासाठी लसीकरण उत्तम पर्याय होता.


यानंतर झालेल्या छोटे खानी कार्यक्रमात मोहिमेत योगदान दिलेले कर्मचारी आणि संस्थांचे सत्कार करण्यात आले. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मांडलेचा आणि डॉ..नीता पाडळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप आणि सत्कार करण्यात आले. कृपामयी रुग्णालयाचे संचालक डॉ. विजय बोरगावकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला..

यावेळी प्रत्यक्ष मैदानात उतरून लोकांना जागरूक करून लसीकरण पर्यंत घेऊन येण्याचे काम करणारे दगडू मोगल, आबासाहेब सकट, मोनिका काळे, शिल्पा मुराडी, डॉ. सारिका बावसकर, चारुदत्त मुश्रीफ यांनी देखील अनुभव कथन केले.


यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये हेमंत लांडगे, संदीप नागोरी, सुनील किर्दक आणि एन्ड्रेस + हौसर स्वयंसेवक संघाचा समावेश होता ज्यात श्रीमती मोनिका काळे, शिल्पा मुरादी, श्री मोगल, श्री सकत आणि एन्ड्रेस + हौसर चारुदत्त मुश्रीफ यांचा समावेश होता. , श्री मिलिंद श्रीखंडे, श्री संदीप तुळापूरकर आणि श्री विनय चितळे यावेळी उपस्थित होते सर्व CAB चे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.