बंदिस्‍त,मोकळया जागेतील सांस्‍कृतिक कार्यक्रम सुरु करण्यास हिरवा कंदील

औरंगाबाद,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कोविड-19 विषाणूच्‍या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असल्‍याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लॉकडाऊन (Break The Chain) चा निर्बंध टप्‍याटप्‍याने कमी कमी करण्‍याबाबत निर्णय झालेला आहे. 

कोविड-19 चे अनुषंगाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यास अधीन राहून औरंगाबाद जिल्ह्यातील “बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम” 22 ऑक्टोबर 2021 पासून पुन्‍हा सुरु करण्याबाबत शासनाने घालून दिलेल्या सूचनेच्या अधिन राहून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर व महानगरपालिका आयुक्त औरंगाबाद यांच्या संयुक्त स्वाक्षरीने औरंगाबाद जिल्हा क्षेत्राकरिता 22 ऑक्टोबर 2021 पासून पुढील आदेशापर्यंत पुढील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे निर्बंध (Break The Chain) लागू करण्यात येत  असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मार्गदर्शक सूचना

परिशिष्ट-अ भाग –01

अ.क्र.बाब / तपशीलशिथिल निर्बंधांबाबत सुचना शासनाच्‍या परिशिष्ट-अ भाग –01 प्रमाणे
1बंदिस्त सभागृह·      सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टव्दारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची / आयोजकांची जबाबदारी असेल.·      बंदिस्त सभागृहाच्या एकुण बैठक क्षमतेच्या 50 टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असु नये.·      बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान 6  फुट) आवश्यक राहिल,·      बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहिल,·      बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल.·      आरोग्य सेतू उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार / आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण ( दोन डोस व दुस-या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित” अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील.·      सभागृहातील सर्व परिसर/खोल्या/प्रसाधनगृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखावे व प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जतुकीकरण करण्यात यावे.·      बंदिस्त सभागृहात उपस्थित सर्वांनी पूर्णवेळ मास्क लावणे आवश्यक राहील.·      सभागृहातील कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणारे सर्व उपकरणांचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक आहे.·      कार्यक्रमासाठीची सहाय्यक कामे त्या-त्या कामांसाठी नेमून दिलेल्या व्यक्तींनीच करावीत.·      कार्यक्रमासाठी लागणारी साधन-सामुग्री (संगीत व्यवस्था/लॅपटॉप /माईक/प्रकाश योजना इ.) जी कोण व्यक्ती हाताळणार असतील  त्यांनीच ती वापरावी याबाबत दक्षता घेण्यात यावी. शक्यतो ज्याने त्याने स्वत:चीच साधनसामुग्री वापरावी.·      बंदिस्त सभागृहामध्ये रंगभूषाकाराची आवश्यकता असेल तर त्यांनी पीपीई कीट धारण करणे आवश्यक आहे.     ·      बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. यास्तव, सुरक्षित अंतर बाबतच्या मानकांनुसार, प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात.·      कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास मनाई राहील.·      परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रामध्ये, हात स्वच्छ करण्यासाठी प्राधान्याने हाताचा – स्पर्श रहित पध्दतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव्य उपलब्ध ठेवावे.·      श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना / शिंकताना प्रत्येकाने स्वत:चे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रुमालाने/ कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.·      सभागृहातील कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे.·      जनजागृतीचा भाग म्हणून सभागृहाच्या दर्शनी ठिकाणी कोविड-19 च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनां वरील भित्तीपत्रके /उभे फलक झळकविण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात.·      सभागृह वातानुकुलीन असेल अशा ठिकाणी तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे.·      खाद्य व पेय पदार्थांच्या क्षेत्रामध्ये, शक्य असेल तेथे तेथे, अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करुन देण्यात यावीत. प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित<