जलजीवन मिशन प्रभावीपणे राबवा -जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड

खुलताबाद ,२२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-जलजीवन मिशन  खुलताबाद तालुक्यातप्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड यांनी केले.

पंचायत समिती येथे जल जीवन मिशन प्रभावीपणे राबविण्यासाठी  ग्रामसेवक व सरपंच यांची मार्गदर्शन व आढावा बैठक जिल्हा परिषद उपाध्यक्ष  एल जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्याप्रसंगी उपाध्यक्ष गायकवाड मार्गदर्शन करताना बोलत  होते.  यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, उपसभापती युवराज ठेंगडे , गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर उपस्थित होते.

पंचायत समिती खुलताबाद मार्फत जल जीवन मिशन योजने अंतर्गत  प्रत्येक गाव वस्ती वर राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने व प्रत्येकी ५५ लीटर पाणी मिळण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करण्यासाठी पाणी  उद्भवापासून ते वितरण व्यवस्थेपर्यंत करावयाच्या कामाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड यांनी सांगितले की, सदरील कामे योग्य , विनाअडथळा , लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे . सदरील संस्था प्रचार प्रसिद्धी, सर्वेक्शन , डीपीआर तसेच सुपरव्हिजन करतील. खुलताबाद तालुक्यासाठी व्याप कोस लिमिटेड संस्था व सेवा संस्था औरंगाबाद यांची निवड करण्यात आली आहे.

उपस्थित सर्व सरपंच ग्रामसेवक यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल जी गायकवाड यांनी व उपअभियंता अशोक घुगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विस्ताराधिकारी एच बी कहाटे यांनी केले. आभार प्रदर्शन पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने यांनी केले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर , जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता नंदकुमार अपसिंगेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण शिंदे, कृषी अधिकारी  अशोक खेडकर, स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा समन्वयक  सतीश औरंगाबादकर  तालुक्यातील सर्व ग्रामसेवक , सरपंच,  स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक व बीआरसी सीआरसी उपस्थित होते.