वैजापूर तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात मंत्री संदीपान भुमरे यांच्याशी माजी नगराध्यक्ष साबेरखान यांची चर्चा

वैजापूर ,२२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील विविध विकासकामे व जवाहर विहिरींसाठी  निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी वैजापूर येथील शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी गुरुवारी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांची औरंगाबाद येथे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत जवाहर विहिरीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व अन्य विकास कामासंदर्भात संदीपान यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.ना.भुमरे यांनी जवाहर विहिरींसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन यावेळी  साबेर खान यांना दिले.माजी नगराध्यक्ष साबेरखान यांच्यासोबत शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख बाळासाहेब जाधव,उपशहरप्रमुख बळीरामसिंग राजपूत, युवासेनेचे आमिर अली आदी उपस्थित होते.