काँग्रेस नेते राजकिशोर (पापा) मोदी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

राजकिशोर मोदी यांच्या प्रवेशाने बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल – अजितदादा पवार

मुंबई ,२१ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाई नगर परिषद अनेक वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

May be an image of 6 people and people standing

राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

May be an image of 8 people and people standing

यावेळी अजितदादा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. आज नव्याने पक्षप्रवेश झालेले पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणी देखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेल्या जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होऊ न देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्षावाढीसाठी काम करू, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

May be an image of 9 people, people standing and indoor

यावेळी आ. सतीश चव्हाण, आ. संजय दौंड, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, बसवराज पाटील, पृथ्वीराज साठे, .सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, संजय वाघचौरे, रा.कॉ. बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रा.कॉ.औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, रा.यु.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राजेसाहेब चव्हाण, शिवाजी सिरसाट, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, भाऊसाहेब तरमळे तसेच राजकिशोर मोदी व विजय चव्हाण यांच्यासमवेत प्रवेश केलेले सर्व सहकारी, पदाधिकारी उपस्थित होते.