राज्यात आज 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 97.43 टक्के

https://6bcd54bb0109afdbcb0fce6f52f7b125.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.htmlNEXTPREV

मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज  1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 27  हजार 426  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.43 टक्के आहे. 
 
राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 7537  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (16), नंदूरबार (0),  धुळे (3), जालना (53), परभणी (33), हिंगोली (23), नांदेड (12),  अकोला (22), अमरावती (11),  वाशिम (02), अकोला (22), बुलढाणा (16), नागपूर (70), यवतमाळ (09),  वर्धा (4), भंडारा (1), गोंदिया (3),  चंद्रपूर (48) गडचिरोली (5 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.