गोदावरी नदीवरील पूल व रस्त्याच्या कामांसाठी भाजपचा भगूर फाटा येथे रस्ता रोको

वैजापूर ,२० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील गोदावरी नदी वरील पुलाचे रखडलेले बांधकाम व नागमठाण-काटेपिंपळगांव (राज्य रस्ता क्र.216) या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने बुधवारी (ता.20) भगूर फाटा येथे ढोल वाजवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Displaying IMG-20211020-WA0111.jpg

या रास्तारोको आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव,तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे व पंचायत समिती सदस्य बाबासाहेब डांगे यांनी केले.गोदावरी नदीवरील रखडलेले पुलाचे काम व नागमठाण – काटेपिंपळगांव या रस्त्याचे कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदन देऊन आंदोलनही करण्यात आले. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आज पुन्हा रास्ता रोको करून लक्ष वेधण्यात आले.

य रास्ता रोको आंदोलनात जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मणराव उघडे, भाजप तालुका सचीव सतीश शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल वाणी, भाजपचे जेष्ठनेते नितीन जोशी,चांगदेव उघडे,संतोष मिसाळ,कडूभाऊ कुरकुटे, अनंता बेळे,महेंद्र बोधक,दादासाहेब मोईन,दिलीप दुशिंग,नारायण मुर्तडक,अशोक आहेर,दिगंबर शेळके,संतोष गायकवाड,अशोक टेमकर,सचीन साळुंखे,सरपंच दादाभाऊ मोईन,दिलीप सवई,उत्तम पवार,रामकीसन विराळे, नानासाहेब वाघचौरे,नंदू गायकवाड,सुभाष मोकाटे, गोरख राशीनकर यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.