प्रलंबित असलेल्या पुरणगांव-डोणगांव रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात,1 कोटी 55 लाखाचा निधी मंजूर

वैजापूर ,२० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रास जोडणाऱ्या वैजापूर तालुक्यातील पुरणगांव ते डोणगांव या 9 किलोमीटर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते.या भागाचे जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांच्या विशेष प्रयत्नाने या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या रस्त्याच्या कामास बुधवारी प्रत्यक्षात सुरूवात झाली.

Displaying IMG-20211020-WA0097.jpg

या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर झाला आहे.या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती व जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे यांच्याहस्ते करण्यात आला.

यावेळी डॉ.दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ ,पंकज ठोंबरे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत शिंदे यांनी केले तर रवींद्र धोरडे यांनी आभार मानले.याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य रावसाहेब जगताप, रा. काँ.चे बाळासाहेब भोसले,शेतकरी नेते धनंजय धोरडे, सत्यजित सोमवंशी,दत्तात्रय खटाणे,संदीप गायकवाड,अर्जुन मोटे यांच्यासह डोणगांव,बाबतरा, लाखगंगा,पुरणगांव या परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.