विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भाजपच्यावतीने आज जन आक्रोश आंदोलन

औरंगाबाद, २०ऑक्टोबर /प्रतिनिधी :-आज शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी व वादळ मुळे झालेल्या  नुकसानी  मुळे आत्महत्या होत आहेत, तरी देखील हे झोपलेले व झोपेचे सोंग घेतलेले , राज्य सरकारला  जाग येत नाही, यांना मात्र आपले खिशे भरण्या मध्ये, वसुली करण्यामध्ये  आघाडी सरकार आज आघाडीवर आहे ,त्या मुळे शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली  मराठवाडा विभागाचे जनआक्रोश आंदोलन औरंगाबाद विभागीय कार्यालयासमोर सकाळी ११ ते ४ या दरम्यान २१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे,

May be an image of 3 people and text that says "भार Dva"
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे

या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी व किसान मोर्चाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनामधून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, या महाभ्रष्ट विकास आघाडी सरकारला झोपेतून जागे करण्या साठी,जन आक्रोश आंदोलन करणार आहे .या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेते पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत असे प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा मकरंद कोर्डे, किसान मोर्चाचे संभाजीनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कल्याण पाटील गायकवाड यांनी कळविले आहे.