नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम व रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी भाजपचे ढोल वाजवून बुधवारी रास्ता रोको आंदोलन

वैजापूर ,१९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचे रखडलेले बांधकाम व नागमठाण ते भगूर-काटेपिंपळगांव (राज्यमार्ग 216) या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे यावे या मागणीसाठी वैजापूर तालुका भाजपच्यावतीने  बुधवारी सकाळी भगूर फाटा येथे ढोल वाजवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

Displaying IMG-20211018-WA0160.jpg

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना वैजापूर तालुका भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गोदावरी नदीवरील अपूर्ण असलेल्या पुलाच्या बांधकामा संदर्भात संबंधित अभियंत्यांना अनेकवेळा भेटून निवेदन दिले तसेच आंदोलन ही करण्यात आले.मात्र अद्याप हे काम सुरू करण्यात आले नाही.तसेच नागमठाण ते भगूर -काटेपिंपळगांव राज्यमार्ग क्र.216 या रस्त्याची फार दुर्दशा झालेली असून या भागातील नागरिकांना दळणवळण करणे अवघड होऊन बसले आहे.संबंधीत रस्ता व पुलाचे काम मंजूर असूनही ही कामे चालू का होत नाही.हे न समजण्या सारखे आहे.ही कामे त्वरित सुरू करावी असे भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भाजपचे तालुका सचिव सतीश पाटील शिंदे,पंचायत समिती सदस्या मुक्ताबाई डांगे,सुभाष भराडे,बाबासाहेब डांगे,नितीन जोशी, विजय चव्हाण,पांडुरंग मेघळे,अनंत बेळे, सचीन साळुंके, अशोक आहेर,महेंद्र बोधक आदींच्या सह्या आहेत.