वैजापूर शहरात मोहम्मद पैगंबर जयंती अत्यंत सध्या पध्दतीने साजरी

वैजापूर ,१९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर शहर व तालुक्यात मोहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलादुनबी) मुस्लीम बांधवांनी मंगळवारी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केली. यानिमित्ताने हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
पैगंबर जयंती निमित्त शहरातील विविध भागात प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला.नौगजीबाबा दर्गा परिसरात हाजी खलील मिस्तरी, काझी मलीक यांच्यातर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले. हैद्राबाद येथील उलेमाचे प्रवचन झाले.आ.रमेश पाटील बोरणारे, मा.नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, वैजापूर मर्चंट बँकेचे मा. चेअरमन बाळूशेठ संचेती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचीन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ ,ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, शहर काझी राजुभाई काझी आदींनी मुस्लीम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही पैगंबर जयंती साध्या पद्धतीने साजरा झाली. हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तर मुस्लीम बांधवांनीही कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या .