कौशल्याधारित रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे-अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

Displaying DSC_6223.JPG

औरंगाबाद,१८ऑक्टोबर /प्रतिनिधी :-   जिल्हयात तरुणांना रोजगार प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्यासाठी कौशल्य आधारित रोजगार निर्मिती करणारे अभ्यासक्रम व प्रशिक्षण कार्यक्रमाचा आराखडा तयार करुन प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शेन केंद्र यांच्या जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत दिल्या.

Displaying DSC_6212.JPG

या बैठकीत सहायक आयुक्त संपत चाटे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्रचार्य अभिजित आलटे, प्रवीण अस्वार, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मसिआचे सागर थोटे, महिला बालविकास अधिकारी गणेश पुंगळे यांच्यासह विविध प्रशिक्षण संस्थाचे प्रतिनिधी व औद्योगिक विकास संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

औरंगाबादमध्ये स्थानिक रोजगाराच्या संधी व क्षेत्र कोणते आहे यावर अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमातून तरुणांनी रोजगार तसेच विविध उद्योगसमूहाना प्रशिक्षण, मनुष्यबळ मिळण्याची व्यवस्था कौशल्य विकास विभाग व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय संस्था व कार्यालयानी कराव्यात. यासाठी विविध सामाजिक संस्थामधून रोजगार व प्रशिक्षण बाबत जे सर्वेक्षण होते त्याचा आधार घ्यावा. कौशल्याविकास विभागाने रोजगार आणि औद्योगिक विकासासाठी माध्यम म्हणून काम करण्याबरोबरच तरुणांची मागणी असणाऱ्या कोर्सेसची प्रवेशक्षमताची मर्यादा वाढवावी. जेणेकरुन रोजगारा बरोबरच आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र याचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी सन 2021 -22 करिता किमान कौशल्य विकास कार्यक्रम योजनेस मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावाचे सादरीकरण समितीसमोर केले. यामध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम आढावा  घेणात आला. तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास  योजना 3.0 प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान संकल्प योजना आढावा याबाबत सादरीकरण केले.