मोटारसायकल अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

वैजापूर-गंगापूर चौफुलीवरील घटना

वैजापूर ,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता.16) सायंकाळी 5.45 वाजेच्या सुमारास वैजापूर – गंगापूर रस्त्यावर घायगांव नजीक घडली.

Displaying IMG-20211017-WA0119.jpg

वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील विलास नामदेव शेळके (वय 53 वर्ष) हे आपल्या पत्नीसह मोटारसायकलवर घराचे बांधकामासाठी स्टील घेण्यासाठी वैजापूर  गंगापूर चौफुलीवरील राजाराम स्टील या दुकानावर आले होते.स्टील खरेदी करून ते ट्रॅक्टरने त्यांनी गावांकडे पाठविले व एक पत्रा राहिला म्हणून ते दुकानावरील कामगाराला सोबत घेऊन ट्रॅक्टरच्या मागे निघाले असता समोरून मोटारसायकलवर भरघाव वेगाने येणाऱ्या रवींद्र चंद्रभान कारले (वय 25 रा. येवला) याने त्यांना जोरदार धडक दिली. झालेल्या अपघातात विलास शेळके यांचा जागीच मृत्यू झाला तर समोरून येणारा मोटारसायकलस्वार रवींद्र चंद्रभान कारले (वय 25 रा. येवला) हा गंभीर जखमी झाला.रवींद्र कारले याच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. याप्रकरणी मयत विलास शेळके यांच्या पत्नी कमलबाई शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र कारले यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.हे.का. किसन गवळी हे अधिक तपास करीत आहेत.