औरंगाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक निमित्त गोयल यांची वैजापूर पोलिस ठाण्याला भेट,पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा

वैजापूर ,१६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- जिल्हा पोलिस अधीक्षक (औरंगाबाद ग्रामीण)  निमित गोयल यांनी वैजापूर पोलिस स्टेशनला नुकतीच भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. अतिवृष्टी व  पूर परिस्थितीच्या काळात पोलिसांनी ग्रामस्थांना केलेल्या मदतीची त्यांनी प्रशंसा केली. तसेच काही महत्वाच्या सूचनाही यावेळी त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या. 

वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती व पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी पोलिस अधीक्षक निमीत गोयल यांचे स्वागत केले. यावेळी श्री.गोयल यांनी वैजापूर पोलिस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी करून काही महत्वाच्या सूचना पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत,गोपनीय शाखेचे संजय घुगे व पोलिस कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.पो.हे.का.मोईस बेग, विजय खोकड,घोटकर यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.