भारतामधील दहशतवाद संपविण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध :- भाजपा राष्ट्रीय सचिव सुनील देवधर

औरंगाबाद, १६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने पाकिस्तानचा दहशतवादाचा बुरखा जगासमोर उघडा पाडला. भारतातील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद व त्यांच्या कारवाया कशा जगभर चालतात हे भारत सरकारने व मोदी सरकारने जगाच्या सर्व व्यासपीठावर ठासून सांगितले, त्यामुळे जगातल्या दहशतवादी कारवाया व पाकिस्तानच्या कारवाया उघड्या पडल्या. भारतामध्ये आता असलेले मोदी सरकार हे सर्वांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी कटिबद्ध आहे ,असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी केले.

मराठवाडा युवक विकास मंडळ आयोजित ‘स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमाले चे हे बावीसावे वर्ष आहे.या व्याख्यानमालेचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते झाले,

या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘जागतिक दहशतवाद आणि भारत’ या विषयावर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव ,आंध्र प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी गुंफले. ते आंध्र प्रदेश येथील कडप्पा जिल्ह्यामधून ऑनलाइन बोलत होते ,भव्य एलईडी स्क्रीन वर सभागृहात ते प्रदर्शित करण्यात आले.

सुनील देवधर बोलत असताना त्यांनी स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा दिला, त्यानंतर जागतिक दहशतवाद आणि भारत या विषयावर आपले विचार मांडले ते बोलत असताना असे म्हणाले की भारत हा सर्वगुणसंपन्न असणारा देश आहे, या देशांमध्ये विविधतेत एकता आहे, परंतु या देशातील काँग्रेस प्रणित , यूपीए सरकार व त्यांच्या गृहमंत्री व पंतप्रधाणांनी, दहशतवादी कारवाया व दहशतवाद या विषयावर कुठलीही ठोस व आग्रही भूमिका घेतली नाही. कारण मतपेटीच्या दबावाखाली त्यांनी देशांमध्ये दहशतवादी कारवाया थांबवण्या साठी भूमिका घेतली नाही, त्यांनी हे ही सांगितले की , बदलता भारत हा सक्षम अशा नेतृत्वाच्या हातात आहे, देशामधील गोरगरीब, वंचित उपेक्षित घटकांचा ,विकास करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहाच्या मुख्य धारेमध्ये आणून भारतामधील मधील दहशतवाद आपण थांबवु शकतो, ते असेही म्हणाले.

पूर्वांचल मधील सर्व राज्यांमधील जनजातींच्या, त्यांच्या विकासाचे महत्त्वाचे सर्व निर्णय आज घेतले जात आहेत, त्यामुळे बोडोलँड असेल किंवा देशांतर्गत विध्वंसक कारवाया करणाऱ्या संघटना असतील ह्या समाजाच्या मुख्य धारेमध्ये व संविधाना वर आधारित असणाऱ्या, शासनाच्या लोकशाही निर्णय प्रक्रियेमध्ये सामील झाले आहेत, याचे सर्व श्रेय हे गतिमान प्रणाली, सर्वांच्या हिताचे व विकासाचे निर्णय घेणारे सरकार आसल्या मुळे आज पूर्वांचल मधील सर्व जणजाती व दहशतवादी संघटना यांनी शस्त्रे खाली टाकले आहे व लोकशाही प्रक्रियेमध्ये सामील झाले आहेत, असेही सुनील देवधर म्हणाले.

जगभरामध्ये इस्लामिक दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना भारतामध्ये मात्र येथील मुस्लीम हे विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील झाल्या मुळे व एका हातात कुराण व एका हातात संगणक मिळाल्यामुळे ते आज दहशतवादी कारवाया करण्यापासून खूप अलिप्त आहे, परंतु आजही जागतिक स्तरावर दहशतवाद हा खूप मोठा धोका आहे, तो धोका ह्या जागतिक दहशतवादी संघटना आज वाढवत आहेत.त्यापासून आपण सर्व भारतीयांनी सावध असले पाहिजे. मोदी सरकार व त्यांचे गृहमंत्री देशातल्या प्रत्येक सुरक्षा एजन्सी ला येणारे इनपुट गांभीर्याने घेतात व त्या कारवाया वेळे आधीच थांबवण्या साठी प्रयत्न करत असतात .आपल्या देशातील आर्मी व पोलिसांना, गुप्तचर यंत्रणांना केंद्र सरकारने पाठबळ दिल्यामुळे आज आपल्या देशातल्या दहशतवादी कारवाया थांबलेल्या आहेत, मोदी सरकार जनतेची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही सुनील देवधर यावेळी व्याख्यान देताना म्हणाले

यावेळी व्यासपीठावर किशोर शितोळे, मराठवाडा युवक विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज शेवाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगिता होके पाटील यांनी केले व वंदे मातरम् तृप्ती खोत यांनी गायिले .

—————————-

स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला
(वर्ष 22 वे)
दुसरे पुष्प
दि.17/10/2021सायं 6 वा.
वक्ते:मयुरेश प्रभुणे
विषय: बदलत्या हवामानाचे आव्हान

——————————————————-