माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा

वैजापूर ,१६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून येथे उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांनी चार तास पुस्तकांचे वाचन करून डॉ. कलाम यांना अभिवादन केले.

नगर पालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात डॉ.कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त शालेय विध्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करून ‘”वाचन प्रेरणा दिन”उत्साहात साजरा केला. समारोपीय भाषणात पालिकेचे माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.वाचनाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तका व्यतिरिक्त वर्तमानपत्र व अन्य पुस्तकांचे वाचन करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. ‘वाचू पुस्तके आम्ही’ ही कविता सादर करून वाचन प्रेरणा दिली.प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जी.जी.राजपूत यांनी केले.शिक्षक बी.बी.जाधव यांनी आभार मानले. शिक्षिका नीता पाटील,सुवर्णा बोर्डे,राजश्री बंड, लता सुखासे, ज्योती दिवेकर,वैशाली पगारे,श्रीमती मुळे यांच्यासह शालेय विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.