‘मोहनजी, तुम्हाला हे मान्य आहे का?”उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना थेट सवाल!

 वचन पाळलं असतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात, मी बाजूला झालो असतो – उद्धव ठाकरे

आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही

मुंबई ,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- आपले पूर्वज हे एकच आहे, असं  मोहन भागवत म्हणाले होते. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का, लखीमपूरमध्ये शेतकरी ठार मारले, ती माणसं काय परग्रहावरून आली आहे काय? असा खडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वाद पेटण्याची चिन्ह आहे.

Image

उद्धव ठाकरे म्हणाले, “ हल्ली काय झालेलं आहे केवळ बोलत जायचं. टीका करायची, विचारांचा पत्ता नाही. कशात काही नाही, एकचा पायपोस दुसऱ्यास नाही. आज देखील जे मोहन भागवातांचे जे विचार आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, हिंदुत्व म्हणजे काय? आणि हे खरंय त्यात काही चूक नाही. की या आपल्या देशात सर्वांचे पूर्वज हे एक होते. आता एकदम पूर्वजापर्यंत मी जात नाही नाहीतर माकडापर्यंत पोहचू आपण. पण या देशापुरता जरी विचार करायचा झाला, तर सर्वांचे पूर्वज एक होते, आहेत हे जर आपल्याला मान्य असेल. तर मग विरोधी पक्षांचे पूर्वज काय परग्रहांवरून आले होते का? आता जे शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांचे पूर्वज का परग्रहावरून आले होते का? लखीमपूरला जे शेतकरी दिवसा ढवळ्या मारले, त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते? हा जो काही विचार आहे की आपण सर्व एक आहोत, हिंदुत्व म्हणजे काय आम्ही दुसऱ्यांचा द्वेष, मत्सर करत नाही. पण हे जे दिवसा ढवळ्या दिसतय हे मोहनजी तुम्हाला तरी पटतंय का? तुम्हाला तरी मान्य आहे का? मी जनतेला विचारतोय तुम्हाला तरी मान्य आहे का?”

Image

शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या दसरा मेळवातून भाजपा, पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणावरून देखील टिप्पणी केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधल्याचे दिसून आले.

Image

आजचा हा क्षण आपल्या आयुष्यात सुवर्ण क्षण आहे. जी पंरपरा शिवसेनाप्रमुखांनी 1966 साली सुरु केली. ती समर्थपणे तुमच्या सर्वांच्या सोबतीने पुढे नेत आहोत याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी हा क्षण आणि हा दिवस आपल्या सर्वांचे आशिर्वाद घेण्यासाठी असतो. आपण पाहिलं असेल शस्त्रपूजन केल्यानंतर मी आपल्या खऱ्या शस्त्रांची पूजा केली, आपल्यावर मी फूल उधळली, ही माझी शस्त्र आहेत, जी शिवसेनाप्रमुखांनी मला दिली आहेत. 

आणि हे आशिर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी एक भावाना असते, हेच प्रेम प्रत्येक जन्मी मला माझे हेच आई-वडिल मिळायला पाहिजेत, माझा कुटुंब, माझा परिवार हाच मिळाल पाहिजे. जन्मही महाराष्ट्रातच झाला पाहिजे, आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटू नये. मला तर सोडाच माझ्या तमाम जनतेलाही मी मुख्यमंत्री आहे असं कधी वाटू नये, मी तुमच्या घरातला कोणी तरी आहे, तुमचा भाऊ आहे, असं वाटो ही माझी इश्वरचरणी प्रार्थना आहे. 

काही जणांना असं वाटतं, जे बोलत होते, मी पुन्हा येईन, ते आता बोलतायत मी गेलोच नाही, बस तिकडे आहे तिकड़ेच, पण जे संस्कार आहे, जी संस्कृती आहे, मला जे शिकवलं, की पदं काय आहेत, सत्ता तरी काय आहे, पदं येतील जातील, सत्ता येईल जाईल, परत येईल पुन्हा येईल, पण कधीही अहंपणा तुझ्या डोक्यात येऊ देऊ नको, ज्या दिवशी तुझ्या डोक्यात हवा जाईल त्या दिवशी तू संपलास. नेहमी जनतेशी नम्र रहा, तो प्रयत्न मी करत असतो नम्र पणाने आशिर्वाद घेत असतो, आणि आशिर्वाद हीच खरी ताकद आहे,त मागून कोणाला मिळत नाहीत, हे खरं वैभव आहे, हे खरं ऐश्वर्य आहे. ते जोर जबरदस्तीने कुणाला मिळत नाही. ते कमावावे लागतात आणि ती कमवण्याची परंपरा आपल्याला मिळाली आहे. 

आणखी एक विषय आहे विजयादशमी म्हटलं तर हिंदूत्त्वाची विचारधारा तर आलीच. आज दोन मेळावे असतात, एक शिवसेनेचा आणि एक आरएसएसचा. आपले विचार एक आहेत, धारा वेगळ्या असू शकतात, म्हणून आणि म्हणून केवळ हिंदूत्व म्हणून भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. ज्यांना अजूनही वाटंत मुख्यमंत्री आहेत, राहिला असतात, पण जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला असता, पण तुमच्या नशिबात नव्हतं आणि म्हणून तुम्ही वचन मोडलंत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

Image

मी हे पद स्विकारलं, एका जबाबदारीने स्विकारलं, केवळ आणि केवळ मी माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्विकारलं. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन, तसं मह्टलं तर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही, मी त्यांना सांगितलं आहे की तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करुन दाखवेन, आणि तो मी दाखवनेच. शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित मी राजकारणातून बाजूला झालो असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

माझ्यावर टीका होतेय, होय हे माझं क्षेत्र नाही, मी पूत्र कर्तव्य निभावण्यासाठी आलो आणि या क्षेत्रात ठामपणे पाय रोवून उभा राहिलेलो आहे. ही जबादारी खांद्यावर आहे, ती जबाबदारी पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या एका निश्चयाने मी उभा राहिलेलो आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

सरसंघचालकांच्या भाषणाबद्दल पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, “त्यांनी पुढे जे काय सांगितलं की, हिंदू राष्ट्र हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा त्यामध्ये सत्तापिपासूपणा नसतो. त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते. तर सर्व समावेशक अर्थाने हा शब्दसंग्रह वापरत असतो. सत्तेसाठी संघर्ष करताना विवेक वापरावा. वैचारीक लढा हवा, युद्ध नको. मग तुमच्या विचारधारेतून तुमच्या वर्गातून जी आता लोक बाहेर पडलेली आहेत आणि सत्ता काबीज करून बसलेली आहेत, त्यांनाही शिकवणी परत लावा जरा एकदा. सध्या जो काय सगळा खेळ सुरू आहे, वाटेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधिनता हा जो एक प्रकार आहे, अंमली पदार्थ हा एक वेगळा भाग झाला. त्याचा तर नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा देखील एक अंमली प्रकारच आहे.”

याचबरोबर, “अगदी बाजार उद्यान समित्यांपासून लोकसभेपर्यंत सर्वकाही माझ्याच अंमलाखाली पाहिजे, हा देखील एक अंमली प्रकारच आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार? कोणी करायचा? आज ज्या पद्धतीने एक-एक प्रकार सुरू आहेत, काय वाटेल ते करा. आता पुढील महिन्यात तुमच्या आशीर्वादातून या आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. अनेक प्रयत्न केले. फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचे प्रयत्न केले. मी तर आज देखील सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा, आजपण सांगतो मी. पण तसं करून पडत नाही. मग आपल्याकडे जसा छापा की काटा खेळ आहे, तसा छापा टाकायचा आणि काटा काढायचा. छापा की काटा? मग तिकडून विचारतात टाकला छापा, काढला काटा? ही थेरं जास्त चालू नाही शकत.” असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “एक विकृती हल्ली आलेली आहे, आणि मला आता असं वाटायला लागलेलं आहे. की हे जे चिरकणं आहे. मग ठाकरे कुटुंबावर हल्ले… हल्ले म्हणजे आता कुणी असा मायेचा पूत जन्माला आलेला नाही, ठाकरे कुटंबावर हल्ला करणारा.. तिथल्या तिथे ठेचून टाकू. पण काही वाटेल ते बोलायचं कुटुंबीयांची बदनामी करायची. हे आता त्यांचं रोजगार हमीचं काम झालेलं आहे. काय करणार, करोनामध्ये सगळं बंद आहे. मग काय करायचं तू चिरकलास किती? एवढा चिरकलास मग हे त्याचे पैसे.. चिरकत रहा..तुम्ही चिरकत रहा पण माझा वाडा चिरेबंद आहे. माझा वाडा चिरेबंद आहे.. टकरा मारा.. मुसंड्या मारा, डोकी फुटतील पण तडा नाही जाणार. अजिबात जाणार नाही.”

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :

आवाज दाबणारा कुणी जन्माला येऊ शकत नाही. १९६६ पासून शिवसेनेची आभिमानास्पद वाटचाल. शिवसैनिक हे शस्त्र.

मी मुख्यमंत्री आहे असे वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे. काहींना वाटत. पद येतील सत्ता येईल जाईल. अहमपणा डोक्यात जाऊ देऊ नकोस हा संस्कार. आशिर्वाद हीच माझी ताकद
माझे भाषण संपल्याची काही जण वाट बघताहेत. चिरकायची सवय ही राजकारणात अलिकडे विकृती. त्यांना ती रोजगार हमी.
हर्षवर्धन पाटील बोलले भाजपात का गेलो? अशी लोक भाजपाची ब्रँड अँबेसेडर. टीव्ही वरील जाहिरातीचा संदर्भ. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आले तर सोडत नाही. ईडी सीबीआयच्या माध्यामातून येऊ नका. समोरासमोर या हे मर्दाचे हिंदुत्वाचे लक्षण नाही. बंगाल सारखे लढण्याची तयारी दाखवा.

हिंदुत्व आता धोक्यात इंग्रजांची निती वापरून भेद केल्या जातो. शिवसेनाप्रमुखांचा मराठी म्हणून एकत्र या. मराठी अमराठी भेद होऊ देऊ नका. मराठा तितुका मेळवावा हिंदुत्व वाढवाव

आपले आणि RSS चे विचार एकच मार्ग वेगळे. शिवसेनेला दिलेले वचन मोडले नसते तर तुम्ही पण मुख्यमंत्री राहिला असता. शिवसेनाप्रमुखांचे वचन म्हणून जबाबदारी घेतली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेलच. हे माझे क्षेत्र नाही. झोली वगैरे कर्मदरिद्री विचार आपले नाही.

आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे. घराबाहेर देश प्रथम. भागवत भाषणांचे २०२० व २०२१ चे संदर्भ. आपले पूर्वज एक होते हे जर मान्य असेल तर विरोधी पक्ष, आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरुन आलेत का? हे मोहनजींना जनतेला मान्य आहे का? सत्तेसाठी संघर्ष नको- भागवत, सध्या जे काही सुरू आहे तुमच्या लोकांची शिकवणी लावा. सत्तेचे व्यसन हा अंमली पदार्थ आहे. अनेक प्रयत्न सरकार पाडण्याचे झाले दोन वर्ष. छापा टाकून काटा काढायचा हे प्रकार जास्त चालू शकणार नाही. देशाचा अमृत महोत्सव. महाराष्ट्र, पंजाब, बंगाल त्यावेळी समोर. ममतांचे आजच्या संघर्षासाठी अभिनंदन.  ९२-९३ साली शिवसेना होती म्हणून तुम्ही आहात. केंद्रिय गृहमंत्रालयाने सांगितले हिंदुत्वाला धोका नाही. आजच्या सत्ताधीशांमुळे हिंदुत्व धोक्यात आहे. सावरकर गांधी कधी वाचलेत का? जर हिंदुत्वाला धोका होते तेव्हा फक्त एकमेव हिंदुह्दयसम्राट उभे होते. शिवसेनाप्रमुखांनी बाबरी पाडल्यावर सुध्दा गर्व से कहो हम हिंदू है म्हणाले. बाकीचे थरथरत होते.

दंगलीत एका महिलेचा दंगलखोरांनी केलेले हाल कथन शिवसैनिकांनी मदत केली. तुमची पालखी वाहत नाही म्हणून आरोप करता. आम्ही हिंदुत्वाचे भारतमातेचे भोई आहे. वाईट काळात तुम्हाला शिवसेना चालली आता हर्षवर्धन पाटील चालतात. कुटुंबावर, सदस्यांवर टीका हे हिंदुत्व नाही तर षंढपणा आहे.
दोन्ही पोटनिवडणुकीत जगातल्या मोठा पक्षाकडे उपरे उमेदवार. शिवसेनेचे काम दाखवणारी चित्रफीत हीच वक्ता. एकनाथ शिंदेंचे धन्यवाद कारण ठाणेकरांनी ९ दिवस रक्तदान केले ही समाजसेवा इतर कुठल्याच पक्षाकडे नाही. रक्तदानात भेदभाव नाही. विक्रमी शिबीर ठाण्यात.

राज्यपालांनी पत्र लिहिले. आम्हाला माता भगिनींचा सन्मान आमच्यात आहे. बलात्कार करणाऱ्याला  फासावर लटकवल्या शिवाय स्वस्थ नाही. राज्यपालांना दिलेल्या उत्तराचे समर्थन. कायदा कडक शासन सगळं करतोहोत. देशात घडू नये यासाठी काय करणार मोदींना अधिवेशन घ्यायला सांगितले. महाराष्ट्रात काही घडले की गळे काढायचे. उत्तर प्रदेशात काय सुरु आहे. २६ नोव्हेंबर ज्यांनी बलिदान केले त्या खात्याला माफीया म्हणणे चूक.

काहींच्या घरी २४ तास शिमगा. उत्तरप्रदेशातचे पोलीस काय भारत रत्न आहेत. महाराष्ट्र सत्तेला नव्हे सत्याला जगणारा आहे. सावरकर गांधी चिरकुट वाद घालणाऱ्यांनी देशासाठी काय केले? आंदोलन स्वातंत्र्य काळात योगदान नाही. तुम्ही ७५ वर्षात देशात काय केले. नुसती रोषणाई करायची? या वर्षी काही बाबतीत उघडपणे चर्चा होणे गरजेचे आहे. महिला अत्याचार, संघ राज्य यावर चर्चा होणे आवश्यक. बाबासाहेबांनी केंद्र व राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केले गेले. आणीबाणी,  परकीय आक्रमण व विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राला आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावे. रोजच्या कारभरात केंद्राची लुडबूड होता कामा नये. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्य बरबाद करणाऱ्यांनी बंद करावे.

मार्मिक सदर वाचा आणि थंड बसा. भूमिपुत्रावर होणाऱ्या अन्यायाला वाचा. मी मुख्यमंत्री आहे हिंदुत्ववादी आहे. परंतु समानतेची हिंदुत्वाची शिवसैनिकांना शिकवण. सत्ताधारी म्हणून सगळा देश माझा.

केंद्रिय मंत्री सोनवालचा निधी गुजरातला वळवण्याचा फतवा. माहिती अधिकारात अनेक गैरप्रकार उघड. जणू काही संपूर्ण जगात महाराष्ट्रात गांजा चरसचा व्यापार सुरु आहे असे एक चित्र उभे करायचे. मुंद्रा अदानी बंदर कुठे येते? दहा ग्रॅम शोधणारे यांनी लक्षात घ्यावे.महाराष्ट्रात दीडशे कोटी पोलीसांनी जप्त.
 केला. कॅगचे ताशेरे गुजरात निधी बाबत.

दहा हजार कोटी अतिवृष्टी साठी दिले. कोविडसाठी निधी यांचा केंद्राकडे. केवळ टीका म्हणून नाही. आपल्या देशात युवा शक्ती मोठी. त्यांच्या रिकाम्या हाताला काम नाही. तरुण गुन्ह्याकडे का वळतोय? व्यवस्थित ही शक्ती घडवावी लागेल नुसत सत्ता हवी म्हणून होणार नाही अगोदर चूल पेटवा. चीन मधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रची प्रतिमा मलिन करु नका. मराठी भाषा भवन उभे राहणार. संभाजीनगरला संतपीठ. मराठी नाटकाचा इतिहास सांगणारे रंगभूमी दालन, मत्सालय, लष्कराचे संग्राहलय उभे करणार.

लढाई न बघितल्याने स्वातंत्र्याबाबत विस्मरण. सैनिक विपरित हवामानात पहारे देतात. दालनात सैनिक पहारा देतात ते वातावरण अनुभवायला मिळेल. लढ्यात सहभागी नव्हता निदान संग्राहलयात तरी सहभागी व्हा.

 हिंदुत्व आता खरे धोक्यात. म्हणून बंगाल प्रमाणे तुमची तयारी आहे? (प्रचंड प्रतिसाद)मराठी अमराठी भेद करु नका. मराठी म्हणून एक व्हा मराठा तितुका मेळवावा प्रमाणे हिंदुत्व सुध्दा वाढवा.