अनंत करमुसे मारहाण प्रकरण,मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक

ठाणे:- महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती परंतु नंतर जामिनावर सोडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी येथे सांगितले.

सत्ताधारी महा विकास आघाडी घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आव्हाड, त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात वर्तक नगर पोलीस ठाण्यात हजर झाले.आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका करण्यात आली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड स्वत: वर्तकनगर पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी अटक करवून घेतली. 

पोलिसांनी मंत्री आव्हाड यांचा जबाब  नोंदवला  आणि नंतर त्यांना  ठाणे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले त्यांनी  आव्हाड यांचा   १०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर  जामीन मंजूर केला.

जितेंद्र आव्हाड म्हणजे ठाकरे सरकारच्या माफिया सरकारचे गुंड आहेत, मंत्र्यांनी अनंत करमुसेचं अपहरण केलं आणि त्यांना मारहाण केली. पोलीस काहीच करत नव्हते, शेवटी कोर्टाने आम्हाला न्याय दिला, आज ठाणे पोलिसांना अटक करायला लावलं, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही आम्ही राज्यपालांकडे मागणी करणार आहोत, अशा गुंड मंत्र्यांची हकालपट्टी करा, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात राहणारे अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर 5 एप्रिल 2020 ला रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि 15 ते 20 जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे. याप्रकरणी तीन पोलिसांना अटक करण्यात आली होती.