वैजापूर तालुक्यात”आजादी का अमृत महोत्सव”अंतर्गत जनजागृती अभियान

वैजापूर ,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संपूर्ण देशामध्ये 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत तालुका विधिसेवा प्राधिकरण व अप्पर जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वैजापूर तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता.१३) वैजापूर येथे भूमिका, नाटक व महिलांचे अधिकार या विषयांवर कार्यक्रम घेण्यात आला व जनजागृती करण्यात आली.

वैजापूर पंचायत समितीच्या स्व.विनायकराव पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या.पी.आर.देशपांडे या होत्या.जिल्हा न्यायाधीश मोहियोद्दीन शेख,न्या.आर.एन.मर्क,न्या.पी.टी. शेजवळ,न्या.पी.आर.दांडेकर,न्या.युनूस तांबोळी,न्या.सचीन शिंदे,तहसीलदार राहुल गायकवाड,गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात भूमिका, नाटक, भारुडद्वारे जनजागृती करण्यात आली तसेच महिलांचे अधिकार याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.शाहीर शेखर भाकरे यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायधीशांसह वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरिदास, उपाध्यक्ष अनिल रोठे,सचीव सईद अली, जेष्ठ विधीज्ञ प्रमोद जगताप,केशव कदम,सोपान पवार,महेश थावरे,धनराज अंभोरे,ऐश्वर्या कोठारी,नगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता निकाळे आदींनी परिश्रम घेतले.