वेरुळमध्ये तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

खुलताबाद ,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वेरूळ येथील शिवालय तिर्थकुंडा जवळ असलेल्या डेंस्ट फॉरेस्ट मध्ये एका ३४ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. कुंदन अवलिया पवार वय ३५ वर्ष राहणार वेरूळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

कुंदन पवार हा श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात रुद्राक्ष माळ व इतर साहित्य विक्रीचा व्यवसाय करीत होता. गेल्या तीन दिवसांपासून तो बेपत्ता होता. वेरूळ येथील शिवालय तिर्थकुंडा जवळ असलेल्या डेंस्ट फॉरेस्ट मध्ये एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस पाटील रमेश धिवरे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी खुलताबाद पोलिसांना कळविली. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.