वैजापूर येथे धम्मचक्र परिवर्तनदिनाचा 86 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

वैजापूर ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- धम्मचक्र परिवर्तनदिनाचा 86 व्या वर्धापनदिन बुधवारी (ता.13) वैजापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

सुरुवातीला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी एकत्र येऊन डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी,


उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे,न.प.चे माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत,नगरसेवक दशरथ बनकर,दिनेश राजपूत,राजेश गायकवाड,साहेबराव पडवळ,रियाज पठाण,भागीनाथ त्रिभुवन,एम.आर.गणवीर,जयप्रकाश बोरगे,विलास म्हस्के,विशाल त्रिभुवन,सुनील त्रिभुवन व ज्ञानेश्वर शिरसाठ आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.श्री.बागुल यांनी वंदना सादर केली. त्यानंतर युवकांनी शहरातून शांतता रॅली काढली,उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती व तहसीलदार राहुल गायकवाड यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखविला.राजेंद्र बागुल,बाबासाहेब वाघ व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथेही धम्मचक्र दिनाचा 86 व वर्धापनदिन साजरा करण्यात आला.