हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांनी घेतला गुळाच्या चहाचा आस्वाद ..! महालगांवला भेट

वैजापूर ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- पावसाबद्दल अचूक अंदाज वर्तविणारे हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांनी मंगळवारी (ता.१२) वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी सवांद साधला.यावेळी गावातील एका हॉटेलमध्ये बसून शेतकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या व गुळाच्या चहाचा आस्वादही घेतला.


डंख हे आज वैजापूर तालुक्यातील महालगांव येथे आले होते..यावेळी त्यांनी वैजापूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल छत्रपतीला भेट दिली.हॉटेल मालक खपके पाटील यांनी त्यांचे स्वागत करून करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.डंख यांनी खपके पाटील यांच्या हॉटेलच्या स्पेशल गुळाचा चहाचा अस्वाद ही घेतला.
यावेळी गंगापूरचे नगरसेवक आबासाहेब शिरसाठ,अर्जुन पाटील जगताप,योगेश धोत्रे सर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.