ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश तुम्ही टिकवून दाखवा, पंकजा मुंडेंनी ठाकरे सरकारला धारेवर धरले

May be an image of 11 people, people standing and text that says 'विभागीय मंगळवार दि. १२ ऑक्टोबर २०२१ स. ११ वाजता मेळावा अभियानाचा धागा हो! 11 ओवीसी जागर अभियान उठ ओवीसी जागा हो, स्थळ श्रीहरी पर दर्गारेड, रोड, संभाजीनगर'

औरंगाबाद : माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ओबीसींचा अध्यादेश  न्यायालयात टिकवून दाखवा आणि त्यानुसार निवडणुका घेऊन दाखवा, अशा शब्दात मुंडे यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले  आहे. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत ओबीसींवर अन्याय झाला,आगामी निवडणुकीत हा अन्याय होता कामा नये.निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण पूर्ववत करावे.ओबीसींच्या विरोधातील कोणतेही षडयंत्र खपवून घेणार नाही.

May be an image of 9 people, people standing and text that says 'छाया- मिमाशंकर नावंदे रचीनी'

पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली.यावेळी बोलताना पंकजा म्हणाल्या, नरेंद्र मोदींनी देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला 10 टक्के आरक्षण देऊ केलं. तर, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन बोलताना त्या म्हणाल्या देवेंद्र फडणवीस यांनीच ते महाराष्ट्राला दिलं. तसेच, राज्य सरकारने पोटनिवडणुकांच्या अगोदरच हा अध्यादेश का काढला नाही?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

May be an image of 4 people and people standing

भाजपच्या ओबीसी मोर्चाकडून ओबीसी जागर अभियानांतर्गत औरंगाबादमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड,आ.संजय कुटे,ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आ.अतुल सावे, माजी मंत्री राम शिंदे, आ. हरिभाऊ बागडे, बापू घडामोडे, शहराध्यक्ष संजय केनेकर आदींसह मराठवाडयातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.या मेळाव्यात बोलताना पंकजा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे सांगितले. आता एक नवीनच षडयंत्र सुरू झालं आहे. बहुजनाची व्याख्या खराब करण्याचं हे षडयंत्र आहे. इकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलला की, तिकडे कोणीतरी षड्यंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा काढतात. अरे मराठा समाजाच्या पाठीवर खंजीर खुपसण्याचं कामही तुम्हीच केलंय. ज्या मुख्यंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढत होतात, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय, असे पंकजा यांनी म्हटले.

May be an image of 6 people, indoor and text that says 'P मंग'

मोदींनी दहा टक्के आरक्षण दिलं आहे. ज्यांची आर्थिक ताकद नाही त्या सवर्णांनाही आरक्षण दिलं. देशातील 22 राज्यात आपली सत्ता आहे. या राज्यांनी निर्णय घेऊन बहुजनांना न्याय दिला. मी मंत्री असताना माझ्याकडे या गोष्टी येत होत्या. त्यावेळी ओबीसींचं 50 टक्क्यांवरचं आरक्षण धोक्यात आलं होतं. हे सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांच्या खालचंही आरक्षण संपुष्टात आलं. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. लोकांमध्ये संताप आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. भाजपच नाही तर ओबीसीही रस्त्यावर उतरला आहे. निवडणुका आहेत म्हणून अध्यादेश काढला. तोच आधी काढला असता तर. ज्या निवडणुका झाल्या त्यातही ओबीसींना फायदा झाला असताना, असंही मुंडे म्हणाल्या.

मी आधीच उपाशी आणि त्यात उपवास, बहुजनांची अवस्थाही अशीच आहे. गोपीनाथ मुंडे म्हणायचे ज्याला जातीची आणि मातीची लाज वाटते त्यांचा काही उपयोग नाही. ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जातीवाद पूर्वीही होता, जातीवाद आताही आहे. गावामध्ये गेल्यावर जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात. संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? असा सवालही त्यांनी केलाय.