“मिशन कवच कुंडलअंतर्गत” वैजापूर शहरात पालिकेच्या वतीने मोफत लसीकरण

वैजापूर नगरपालिका व उपजिल्हा रुग्णालयातर्फे माझे कुटुंब-माझी जबाबदारी व “मिशन कवच कुंडल अंतर्गत” शहरातील विविध प्रभागात मोफत कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे..शहरातील सर्व नागरिकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घेऊन आपण व आपल्या कुटुंबियांला कोरोनापासून दूर ठेवावे.असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत  व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांनी केले आहे.

Displaying IMG-20211012-WA0079.jpg

नगरपालिकेच्या वतीने रविवार पासून शहरातील विविध प्रभागात कोविड लसीकरण सुरू करण्यात आले असून, नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.आज मंगळवारी शहरातील प्रभाग क्र.सहा,सात व आठ मधील नागरिकांसाठी पालिकेच्या श्री स्वामी समर्थ विद्यालय व सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात लसीकरण करण्यात आले.श्री.स्वामी समर्थ विद्यालयात न.प.चे माजी शिक्षणाधिकारी ठाकूर धोंडीराम सिंह व शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरुवात झाली.शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, दीपक साळुंके,शाळेचे मुख्याध्यापक आर.डी.वसावे शिक्षक एस.आर.शेलार,उर्मिला गायकवाड,निकिता पवार,तुषार साबळे आदींनी सहभाग नोंदवला.सावित्रीबाई फुले विद्यालयात नगरसेवक डॉ.निलेश भाटिया यांच्या उपस्थितीत लसीकरण सुरू झाले.पालिकेचे मा.नगराध्यक्ष साबेर खान, नगरसेवक शैलेश चव्हाण यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन प्रभागातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.