भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीच्या एकूण 95.89 कोटी मात्रा

  • गेल्या 24 तासांत, लसीच्या 65 लाख 86 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
  • सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.04 % आहे; मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर
  • गेल्या 24 तासांत देशात 14,313 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
  • भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (2,14,900) आतापर्यंतच्या एकूण बाधितांच्या संख्येच्या 0.63 %
  • साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.48%) गेले 109 दिवस 3% पेक्षा कमी

नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार,गेल्या 24 तासांत,कोविड प्रतिबंधक लसीच्या 65,86,092  मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड 

प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या 

संख्येने 95.89  कोटी मात्रांचा  (95,89,78,049)   टप्पा  पार केला  आहे. देशभरात 

93,66,392  सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. 

गेल्या 24 तासांत 26,579  रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची  

सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,33,20,057 झाली आहे.परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 98.04 % आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 107  दिवस  नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून 

कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत,14,313 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. 224  दिवसांमधील 

एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांची ही सर्वात कमी संख्या आहे. देशातील  कोविड 

सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2,14,900  इतकी आहे आणि ही गेल्या 212  दिवसातील  सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.63 %आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 11,81,766 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत 

एकंदर 58 कोटी50  लाखांहून अधिक (58,50,38,043) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक 

पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.48% असून गेले 109 दिवस हा दर 3%हून कमी राहिला आहे. 

तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.21% आहे.  दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 43  दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग  126  दिवस हा दर 5% हून कमी 

राहिला आहे.