औरंगाबाद मनपाच्या आठ शाळांना स्मार्ट टीव्ही भेट

असुदे फाउंडेशनच्या माध्यमातून मनपाच्या शाळांमधील शिक्षकांचे प्रशिक्षण

औरंगाबाद, ११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-औरंगाबाद महानगरपालिका व असुदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेतील  आठ शाळांमध्ये इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लास बनविण्यात आले. या स्मार्ट क्लासमध्ये  स्मार्ट टीव्ही, वेबकॅम कॅमेरा व  इयत्ता दहावीचा संपूर्ण अभ्यासक्रम ऑडिओ ,व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

       महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे याप्रसंगी म्हणाले की आम्हाला खरोखरच खूप आनंद होत आहे की, असुदे फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा कोरोना नंतर पुन्हा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी अगदी योग्य वेळेस विद्यार्थ्यांसाठी हा स्मार्ट क्लास उपलब्ध करून देण्यात आला. निश्चितच या स्मार्ट क्लास च्या माध्यमातून विद्यार्थी शाळेत आल्यानंतर या आठही शाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय चांगले अध्ययन अनुभव सहज देता येतील.याचबरोबर शिक्षकांना देखील या स्मार्ट क्लास ची खूप मदत होईल.

    असुदे फाउंडेशन च्या माध्यमातून या आठही शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी असुदे फाउंडेशनच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी अलरीया खारगे म्हणाल्या की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्यासमोर जाताना आवश्यक असणाऱ्या दोन महत्वपूर्ण बाबींचा विचार यात करण्यात आला यात 1  कोरोना नंतर विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य कसे राहावे यादृष्टीने मानसशास्त्र च्या प्रोफेसर रक्कील अकिलस कर्ट्झटाऊन विद्यापीठ अमेरिका यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन केले.त्यानंतर कोम्पकिंन चे मरविन जॉन्सन यांनी हा स्मार्ट टीव्ही वर्गांमध्ये कशा कशा पद्धतीने हाताळला जाऊ शकतो,विद्यार्थ्यांना या स्मार्ट क्लास चा जास्तीत जास्त फायदा कसा होऊ शकतो हे सांगून त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ही शिक्षकांना दाखविण्यात आले. याच बरोबर विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शनासाठी हा टीव्ही अतिशय महत्वाचा असून नॉर्थ स्टार उपक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातील करियर संबंधीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शाळेतच या स्मार्ट क्लास मध्ये सहज उपलब्ध करून दिले जाईल असेही अलरीया खारगे  म्हणाल्या यामुळे करियर निवडतांना मुलांना याचा निश्चित फायदा होईल.