“आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत वैजापुरात विद्यार्थ्यांची रॅली: न्यायधीश व वकीलांचा सहभाग

वैजापूर ,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- तालुका विधीसेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “आजादी का अमृतमहोत्सव” या उपक्रमांतर्गत तसेच बाल कन्या दिन व बेटी बचाव अभियानांतर्गत सोमवारी (ता.11) वैजापूर शहरातून शालेय विध्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.रॅलीत न्यायधीश, वकील व अधिकारी सहभागी झाले होते. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Displaying IMG-20211011-WA0288.jpg

जिल्हा न्यायालय परिसरातून ही रॅली काढण्यात आली. रॅलीत येथील सेंट मोनिका इंग्रजी शाळेतील विद्यार्थी, जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व न्यायाधीश, वकील व अधिकारी यांनी सहभाग घेतला.स्टेशन रोडवरील सेंट मोनिका इंग्रजी शाळेत रॅलीचा समारोप करण्यात आला.

Displaying IMG-20211011-WA0287.jpg

बाल कन्या दिनानिमित्त न्या.मोहियोद्दीन शेख, न्या.आर.एन.मर्क,न्या.पी.टी. शेजवळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.न्या.शेख यांच्याहस्ते चित्रकला स्पर्धेचे यावेळी उदघाटन करण्यात आले.

Displaying IMG-20211011-WA0286.jpg

या रॅलीत न्या.पी.आर.दांडेकर, न्या.युनूस तांबोळी,न्या.सचिन शिंदे, तहसीलदार राहुल गायकवाड,वकील संघाचे अध्यक्ष राजेन्द्र हरिदास,उपाध्यक्ष अनिल रोठे,सचीव सईद अली, कोषाध्यक्ष प्रफुल्ल पोंदे,जेष्ठ विधिज्ञ प्रमोद जगताप,महेश कदम,डी.के.राजपूत,सोपान पवार,योगेश थावरे, ऐश्वर्या कोठारी,डॉ.सविता निकाळे,सहाय्यक फौजदार धनंजय भावे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी व वकील सहभागी झाले होते.