सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले कोविड-19 रुग्ण 96,000 हून अधिक

बरे होण्याचे प्रमाण वाढून 58.24% वर पोहोचले

नवी दिल्ली, 26 जून 2020

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारसह राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या श्रेणीबद्ध, पूर्व-प्रभावी आणि कृतीशील उपाययोजनांमुळे उत्साहवर्धक परिणाम दिसत आहेत.

सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 96,173 हून अधिक आहेत.

गेल्या 24 तासात कोविड-19 चे एकूण 13,940 रुग्ण बरे झाले त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या  2,85,636 झाली आहे. याद्वारे कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 58.24% वर पोहोचले आहे.

सध्या 1,89,463 सक्रिय रुग्ण असून ते सर्व सक्रिय वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

कोविड -19 चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने गेल्या 24 तासात 11 नवीन प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. भारतात सध्या कोविड -19 समर्पित 1016 निदान प्रयोगशाळा आहेत. यात सरकारी क्षेत्रातल्या 737 आणि 279 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

सद्य स्थिती खालीलप्रमाणे आहेः

  • जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा:  560 (सरकारी: 359 + खाजगी: 201)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 369 (सरकारी: 346 + खाजगी: 23)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 87 (शासकीय: 32 + खाजगी: 55)

कोविड -19 च्या नमुने तपासणीची संख्याही दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासात प्रयोगशाळेत  2,15,446 चाचण्या करण्यात आल्या. आजमितीस एकूण 77,76,228 नमुने तपासण्यात आले.देशभरात कोविड-19 महामारीविरुद्धचा लढा एकत्रित प्रयत्नाच्या रुपात अखंड सुरु आहे. कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात ईशान्येकडील राज्यातील वैद्यकीय सेवेच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र  सरकारने सक्रियपणे आणि जोरदार समर्थन दिले आहे. ईशान्येकडील (एनई) राज्यांत देशाच्या तुलनेत कोविड -19 रुग्णांचे प्रमाण कमी आहे. खाली दिलेल्या तक्त्यानुसार, आजमितीस सक्रिय रुग्ण 3731 आहेत, तर बरे झालेले रुग्ण त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे 5715 आहेत. मृत्यू दर सातत्याने कमी असून मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीममध्ये मृत्यूची नोंद नाही.ईशान्येकडील राज्यातील कोविड -19 चा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नातील मोठा अडसर होता तो म्हणजे चाचणी सुविधांचा पूर्णतः अभाव. परंतु, आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे, ईशान्येकडील राज्यात सार्वजनिक क्षेत्रातील 39 आणि खाजगी क्षेत्रात तीन चाचणी प्रयोगशाळा मिळून एकूण 42 प्रयोगशाळा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.