ऊर्जामंत्री डॅा.नितिन राऊत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

औरंगाबाद,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्याचे ऊर्जामंत्री डॅा.नितिन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बौद्ध लेणी येथे भिक्कु संघाच्या वतीने डॅा.राऊत यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली व विहारात अन्नदान देखील करण्यात आले.

मातोश्री वृद्धाश्रम येथील वयोवृध्द व अनाथ नागरिकांना अन्नदान करण्यात आले. बाबासाई बहुद्देशिय एयआयव्ही ग्रस्त पालकांच्या मुलांना अन्नदान देखील करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॅा.जितेंद्र देहाडे व मित्र परिवार यांनी केले होते. यावेळी मोहित जाधव, सचिन शिरसाट, गुरमित गिल, नरेश पाखरे, सागर नागरे, गणेश वैश्णव व सोनु पाईकडे उपस्थित होते.