लॉकडाऊनच्या काळात ५०१ सायबर गुन्हे दाखल; २६२ जणांना अटक

मुंबई दि.26-  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 501 विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले असून 262 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात २५१ सायबर गुन्हे दाखल

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. 25 जूनपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप-  196 गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स –  206 गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ-  27 गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  4 गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  59 गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 262 आरोपींना अटक.

■  107 आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यात एका नवीन गुन्ह्याची नोंद. त्यामुळे विभागातील

गुन्ह्यांची संख्या 44 वर

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात राजकीय टिपणीचा मजकूर असणाऱ्या आशयाचे विधान केले व ते सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील शांतता भंग होऊन ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. 

फेक पेमेंट लिंक्सपासून सावधान

सध्या कोरोना महामारीच्या काळात वेगवेगळ्या सामाजिक संस्था कार्यरत आहेत व त्यांच्या कार्यासाठी त्यांना भरपूर लोक देणग्याही देत आहेत . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की,  बऱ्याच सायबर भामट्यांनी फेक पेमेंट लिंक्स सुरु केल्या आहेत . त्यामुळे देणगी देणाऱ्या व्यक्तीस लक्षात येत नाही की, त्यांनी पैसे पाठवलेत त्या  लिंक्स व अकाउंट खरे आहे की खोटे .त्यामुळे आपण कोणत्याही संस्थेला देणगी देऊ इच्छिता तर त्यांची सर्व माहिती जसे की बँक अकाउंट नंबर,किंवा मोबाईल पे लिंक्स खऱ्या आहेत का याची खात्री  करून घ्या. त्या संस्थांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या संस्थेच्या कार्यालयाच्या  किंवा संबंधित व्यक्तीच्या  फोन नंबरवर कॉल करून त्या संस्थेच्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळालेली बँक खात्याच्या  माहितीबाबत खातरजमा करून घ्या ,तसेच जर संस्थेचा ई-मेल आयडी दिला असेल तर त्यावर ई-मेल पाठवून त्याचे उत्तर मागवून घ्या व मगच आपली देणगी भरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *