नवरात्रोत्सव : विद्यानगर वॉर्डात गजानन कॉलनी येथे युवासेनेचे जिल्हा समन्वयक अक्षय खेडकर यांच्या हस्ते आरती

औरंगाबाद,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्रात नुकत्याच घेतलेल्या महाविकास आघाडीच्या मंदिर उघडण्याच्या निर्णयामुळे औरंगाबाद  शहरात सोशल डिस्टंन्ससिंगचे पालन करून मोठ्या उत्साहाने  शहरातील सर्व  नागरिक नवरात्र उत्सव साजरा करत आहेत. 


आज नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेच्या दिवशी विद्यानगर वॉर्डातील र्नगरिकांनी गजानन कॉलनी येथे मोहटादेवीच्या मंदीरात युवा सेनेचे जिल्हा समन्वयक अक्षय खेडकर व त्यांच्या मातोश्री लता खेडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात कोरोना नियमांचे पालन करून आरती करण्यात आली तसेच  

या ठिकाणी विद्यानगर वॉर्डाचे उपविभाग प्रमुख दत्ता भाऊ निंबाळकर ,उपविभाग प्रमुख लक्ष्मण साळवे,साधना सोनटक्के, लिलाबाई भानुसे ,उरसाल ताई ,विजया निंबाळकर, दिव्या चौधरी, ज्योती मुळे, मगर बाई ,मीनाताई, पाटील मॅडम , अभिजित पाटील , सचिन गाडेकर अरुण राजपूत ,अविनाश खेडकर ,अभिजित मुळे  यांच्यासह वॉर्डातील महिलांची उपस्थिती होती.