लातूर जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करुन घ्यावे-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

  • मिशन कवच कुंडल मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण
  • जिल्ह्यात पहिला डोस – 5 हजार 258 तर दुसरा डोस – 4 हजार 977 असे एकूण 10 हजार 235 नागरिकांचे लसीकरण

लातूर,९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मिशन कवच कुंडल मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आवाहन केले आहे.
राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार लातुर जिल्ह्यामध्ये मिशन कवच कुंडल ही मोहीम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सर्व विभागप्रमुख आयएमए, व्हीएसटीएस यांची बैठक घेऊन सर्व विभागांना सक्रिय सहभाग घ्यावा, असेही आवाहन केले आहे.


जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात पहिला डोस – 443, दुसरा डोस- 676 असे एकूण 1 हजार 119 तर लातूर महानगर पालिकातंर्गत पहिला डोस -893, दुसरा डोस-846 असे एकूण 1 हजार 739 इतके लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात पहिला डोस – 5 हजार 258 तर दुसरा डोस- 4 हजार 977 असे एकूण 10 हजार 235 इतक्या जिल्ह्यातील नागरिकांना मिशन कवच कुंडल मोहिमेतंर्गत लसीकरण झाले आहे.
दिनांक 8 ऑक्टोबर, 2021 रोजी म्हणजेच पहिल्या दिवशी लातूर जिल्ह्यात 244 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली असून या सत्रामध्ये 10 हजार 235 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरणाची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे.


ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला डोस – 17 , दुसरा डोस-34 असे एकूण 51, ग्रामीण रुग्णालय चाकूर येथे पहिला डोस – 29, दुसरा डोस – 39 असे एकूण 68, ग्रामीण रुग्णालय देवणी येथे पहिला डोस – 17 , दुसरा डोस-19 असे एकूण 36, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला डोस – 02 , दुसरा डोस – 18 असे एकूण 20, ग्रामीण रुग्णालय बाभळगांव येथे पहिला डोस – 31, दुसरा डोस – 20 असे एकूण 51, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला डोस – 24 , दुसरा डोस – 53 असे एकूण 77, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी येथे पहिला डोस – 15 , दुसरा डोस – 23 असे एकूण 38, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला डोस – 12 , दुसरा डोस – 23 असे एकूण 35, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे पहिला डोस – 34 , दुसरा डोस – 67 असे एकूण 101, ग्रामीण रुग्णालय औसा येथे पहिला डोस – 42, दुसरा डोस – 89 असे एकूण 131 इतके लसीकरण झाले आहे.
उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला डोस – 68 , दुसरा डोस – 64 असे एकूण 132, उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथे पहिला डोस – 152 , दुसरा डोस – 227 असे एकूण 379 इतके लसीकरण झाले आहे.