वैजापूर तालुक्यात ८३३.३ मिलिमीटर पाऊस

सर्वाधिक १११४ मिलिमीटर पाऊस लासुरगांव मंडळात

वैजापूर,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात यावर्षी अतिपाऊस झाला.पावसाने सरासरी ओलांडली असून,आतापर्यंत ८८३.३ मिलिमीटर म्हणजेच १६०.६ टक्के सरासरीच्या दीडपट पावसाची नोंद झाली आहे.तालुक्यात सर्वाधिक १११४ मिलिमीटर पाऊस लासुरगांव मंडळात, तर त्याखालोखाल शिऊर मंडळात १०२२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
वैजापूर तालुक्यात आजपर्यंत शुक्रवार (ता.८) झालेला मंडळनिहाय पाऊस पुढीलप्रमाणे – वैजापूर (८४६ मि.मी.), लाडगांव (७९९ मि.मी.),नागमठाण (६४२ मि.मी.),महालगांव (८१५ मि.मी.),लासुरगांव (१११४ मि.मी.), लोणी (८५९ मि.मी.) शिऊर (१०२२ मि.मी.),गारज ((९०९ मि.मी.),बोरसर (९२१ मि.मी.), व खंडाळा (९०६ मि.मी.)अनेक वर्षानंतर तालुक्यात यावर्षी मोठा पाऊस झाला आहे.जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले असून, नद्या -नाले ओसंडून वाहत आहे.