नारंगी धरणाच्या उजव्या कालव्याचा पूल व चारीची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी

वैजापूर ,८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-नारंगी धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या वैजापूर शहरालगतच्या शिंदे वस्तीजवळ नारंगी धरणाच्या उजव्या कालव्याचा  पूल व चारीची दुरुस्ती करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात आ.रमेश पाटील बोरणारे यांनी नांदूर-मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.वनगुजरे यांना सदर कालव्याची पाहणी करून उचित कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या संदर्भार दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वैजापूर शहरानजीक कोपरगाव रस्त्यावर शिंदे वस्ती असून,या वस्तीजवळून नारंगी धरणाचा उजवा कालवा जातो.या कालव्यावरील पूल व चारीची अवस्था खराब झाली असून,चारीचे पाणी लिकेज होत आहे.त्यामुळे या कालव्यावरील पूल व चारीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.आ. बोरणारे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन नांदूर-मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश वनगुजरे यांना याप्रकरणात लक्ष घालण्याबाबत निर्देश दिले. 
युवासेनेचे श्रीकांत साळुंके,अजय पाटील शिंदे,भीमराव शिंदे,प्रवीण वाणी,संतोष तांबे,गुड्डू साळुंके,शेटे पाटील यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांनी पूल व चारी दुरुस्तीबाबत अभियंता प्रशांत वनगुजरे यांना निवेदन दिले आहे.