1971 च्या युद्धातील माजी नौदलसैनिक अधिकाऱ्यांना बीएनएस समुद्र अविजन जहाजावर केले सन्मानित

नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा भाग म्हणून, बांगलादेशचे उच्चायुक्त महंमद इम्रान यांनी 5 ऑक्टोबर 21 रोजी विशाखापट्टणम येथे झालेल्या सोहळ्यात 1971 मध्ये बांग्लादेशच्या मुक्तीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत देशभरातील भारतीय नौदलाच्या 10 माजी सैनिक अधिकाऱ्यांना सन्मानित केले . 

बीएनएस समुद्र  अविजन या जहाजावर या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रिअर ऍडमिरल  तरुण सोबती, व्हीएसएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इस्टर्न फ्लीट या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रियर ऍडमिरल ज्योतिन रैना, एनएम, व्हीएसएम सीएसओ (ऑपरेशन्स) आणि ईएनसीचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.