वैजापूर तालुक्यातील गंगथडी भागात ढगफुटी,अनेक गावांचा संपर्क तुटला- नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वैजापूर तालुक्यात 154 टक्के पाऊस

वैजापूर ,५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील गंगथडी व अन्य भागात सोमवारी (ता.४) रात्री मुसळधार पाऊस झाला असून, नद्या-नाले ओसंडून वाहू लागले आहेत.अनेक गावांचा संपर्क तुटला असून,पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. वीज पडल्यामुळे मौजे धोंदलगाव येथे एक बैलाचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरले असून, बोर- दहेगाव धरणातून आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास १२८० क्यूसेसने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. सटाणा येथील तलाव ही पूर्णपणे भरले असून,सांडव्यातून पाणी वाहत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


काल रात्री वैजापूर तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले.गंगथंडी भागासह तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून, नद्या-नाल्याना पूर आला आहे.पावसामुळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने वैजापूर-सावखेडगंगा-श्रीरामपूर रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. डागपिंपळगांव- भालगांव  रस्ताही बंद झाला असून, लाडगांव-सावखेडगंगा संपर्क तुटला आहे.ढगफुटीमुळे नांदूरढोक,बाभूळगांव गंगा,हिंगोणी परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली आली असून, ऊस, मका व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. मौजे धोंदलगाव येथे वीज पडून कचरू गंगाधर आवारे या शेतकऱ्याचे एक बैल मरण पावले आहे. ढेकू नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

आजपर्यंत तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस