शेतकऱ्यांना शंभर टक्के पीकविमा मिळावा यासाठी प्रयत्न करणार- केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड

वैजापूर ,५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सोमवारी(ता.४) वैजापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. झालेल्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना शंभर टक्के पीकविमा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.पंचनाम्याची वाट न पाहता राज्यसरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी.अशी मागणीही डॉ.कराड यांनी यावेळी केली. 

वैजापूर तालुक्यातील मणूर,बायगांव,जांबरखेडा, लाखणी,भायगांवगंगा,उंदिरवाडी,राहेगांव, सोनवाडी, लासुरगांव आदी गावांना डॉ.कराड यांनी भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.शेतकऱ्यांशी चर्चा करून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अहवाल सादर करावा, केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन डॉ.कराड यावेळी शेतकऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यात डॉ.कराड यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे,जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी,लक्ष्मणराव औटी,उपाध्यक्ष संजय खांबायते,नारायण तुपे,तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे,कैलास पवार,विजय घोडके,अनिल पाटील वाणी,अशोक शेळके,गोरखनाथ घायवट,साईनाथ ठोंबरे,विनोद कदम,नाना गुंजाळ यांच्यासह कार्यकर्ते व शासकीय अधिकारी उपस्थित होते.