CSMSS आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे सर्व रोग निदान व नस्य पंचकर्म तपासणी व उपचार शिबीर

औरंगाबाद,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलीत आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग, आयुष मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, संचालक आयुष विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार पद्व्यूत्तर पंचकर्म विभागातर्फे ०५ ते  १२ ऑक्टोबर-२०२१ रोजी सर्व रोग निदान तसेच अल्झायमर सारख्या वार्धक्याच्या आजारानिमित्त चिकित्सा आणि नस्य पंचकर्म तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.

 कोविड-१९ या महामारीच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सोशल डिस्टंसिंग व इतर सर्व खबरदारी घेत सरकारी नियमांचे पालन करत सकाळी नऊ ते एक वाजेच्या दरम्यान होणाऱ्या शिबिरामध्ये वार्धक्याचे आजार तसेच संधिवात, वातरक्त, डोकेदुखी, अससंधीचे विकार, गृध्रसी, अल्झायमर आदी वाताच्या आजाराचे निदान व उपचार, योग्य व्यक्तीस पंचकर्म सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. या शिबिरास येऊन आजाराची तपासणी व उपचार करून घ्यावेत असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. या शिबिरासाठी तज्ञ चिकीत्सक म्हणून  डॉ. उदय नेरळकर, डॉ. रमेश सोनवणे , डॉ. गणेश बाराहाते, डॉ मेघा सुरवसे , डॉ चिन्मय तांदळे आणि  पद्व्यूत्तर डॉक्टर्स उपचार करणार आहेत. गरजुंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.