वसंत क्लब या संस्थेतर्फे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवा – माणिक आहेर

वैजापूर ,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील वसंत क्लब ही एक चांगली संस्था असून,या संस्थेतर्फे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात यावे.असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी  माणिक आहेर यांनी रविवारी क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.

Displaying IMG-20211003-WA0132.jpg

क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.क्लबचे सहसचिव डॉ.संतोष गंगवाल यांनी सभेपुढे अहवाल सादर केला.सभेपुढे ठेवण्यात आलेल्या विविध विषयांवर चर्चा झाली. क्लबचे सभासद जेष्ट विधीज्ञ बाबुराव परदेशी,आसाराम रोठे, माजी नगराध्यक्ष साबेर खान,प्रा.के.एम.बोरणारे, खुशालसिंग राजपूत आदींनी चर्चेत सहभाग नोंदवला.

क्लबचे उपाध्यक्ष डॉ.व्ही.जी.शिंदे, सचीव जफर खान,सहसचिव डॉ.संतोष गंगवाल,संचालक कय्युम सौदागर यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. विविध विषयांवर चर्चा होऊन सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.या सर्वसाधारण सभेस क्लबचे संचालक मेजर सुभाष संचेती,तुषार पालेजा,डॉ.निलेश भाटिया, प्रमोद जगताप, संजय बत्तीसे, विष्णू जेजुरकर, सचिन दहीभाते,संजय पाटील निकम,बाळासाहेब जाधव,  प्रवीण साखरे,प्रा.के.ए.मगर,प्रा.पी.एम.शिंदे,हरिदास आसर,हरकचंद लोढा,गोपालदास आसर, राजेंद्र साळुंके,घनश्याम वाणी, बाबासाहेब जगताप, बिलाल सौदागर यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.