घायगांव येथे कायदेविषयक सहाय्य व सल्ला शिबीर

वैजापूर ,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील घायगांव येथे तालुका विधिसेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व घायगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक सहाय्य व सल्ला शिबिर झाले. “आझादी का अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर हे होते.तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जे.तांबोळी,एस.आर.शिंदे,एस.एस.निचळ तहसीलदार राहुल गायकवाड,गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष आर.एस.हरिदास यांनी प्रास्ताविक केले. तहसीदार राहुल गायकवाड यांनी संजय गांधी निराधार योजना,सातबारा,गावरस्ते,शिवरस्ते याविषयी माहिती दिली. तर ऍड.डी.टी डघळे यांनी जेष्ट नागरिकांचे हक्क व अधिकार याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली.

जिल्हा न्यायाधीश डी.एम.आहेर यांच्या अध्यक्षीय भाषणाने शिबिराचा समारोप करण्यात आला. सुत्रसंचलन मयुरी भुसारे यांनी केले तर तंटा मुक्ती समितीचे उपाध्यक्ष सागर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.या शिबिरास वकील संघाचे उपाध्यक्ष अनिल रोठे,सचीव सईद अली,प्रफुल्ल पोंदे,सोपान पवार,नवनाथ गायकवाड,आर.डी.शिरसाठ,महेश कदम,अमोल भुसारे,संदीप गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.