“स्वारातीम” विद्यापीठामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नांदेड,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- थोर स्वातंत्र्य सेनानी, हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते “ स्वामी रामानंद तीर्थ” यांचा दि. ०३ ऑक्टोबर हा जन्मदिन त्यानिमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठ प्रांगणातील  पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

विद्यापीठाच्या स्वागत कक्षामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, उपवित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, प्रा. शैलेश वाढेर, सहा. कुलसचिव रामदास पेदेवाड, उद्धव हंबर्डे, शहाजी हंबर्डे, गोविंद हंबर्डे, जीतुसिंग शिलेदार, गणपत लुटे, पठाण सिद्धिकी, प्रमोद हंबर्डे, मधुकर आळसे, कपिल हंबर्डे, गोपिराज हंबर्डे, रामदास खोकले, बबन हिंगे, दत्ता हंबर्डे, गंगाधर हिंगे, यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (कोव्हीड-१९) नियमाचे  पालन करून कार्यक्रम झाला.